..... महाराष्ट्र शासन महसूल विभाग अंतर्गत तहसील मेहकर अंतर्गत महसूल मंडळ नायगाव दत्तापूर येथे बुधवारी चार जून रोजी"" छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर""" उत्साहात पार पडले त्या ला सामान्य जनता व शेतकरी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
..... शासनाच्या विविध विकासाच्या योजना सामान्य जनता व शेतकऱ्यापर्यंत थेट पोहोचण्यासाठी सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले.
..... सदर शिबिर आणि शासकीय योजना विस्तृत विवेचन करून जनतेसाठी फायद्याच्या असून सर्वांनी याचा फायदा घ्यावा असा आवाहन मेहकर महसूल उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांनी केले आहे
...... याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून स्थानिक आ. प. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष राजाभाऊ रुपराव रहाटे, शेंदला सरपंच पती भुजंगराव रहाटे, प्राचार्य भगत सर, नायब तहसीलदार प्रवीण देशमुख, कृषी संशोधक शास्त्रज्ञ डॉ सुरेंद्र उपस्थित होते
...... याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्र दिल्ली येथील डॉ तिजारे मॅडम त्यांनी शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन केले, यावेळी महसुल विभागाच्या विविध योजनांचे नायब तहसीलदार देशमुख यांनी विस्तृत विवेचन केले, कृषी विभागातर्फे पर्यवेक्षक विनोद मोरे यांनी माहिती सांगितली, ,पिक विमा कंपनीतर्फे वाघ साहेबांनी माहिती दिली, आरोग्य विभागातर्फे डॉ चव्हाण मॅडम यांनी माहिती सांगितली.
..... या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेतू चालक भुसारी यांनी केले तर प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन नितीन बोरकर मंडळ अधिकारी नायगाव दत्तापूर यांनी केले.
....... समाधान शिबिराच्या यशस्वीतेसाठी निलेश मडके तहसीलदार मेहकर यांचे मार्गदर्शनाखाली प्राचार्य भगत सर व त्यांची कर्मचारी, महसूल मंडळ नायगाव दत्तापूर मधील ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, हेतू चालक ,आधार केंद्र चालक, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले
0 Comments