Ticker

6/recent/ticker-posts

महिलांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवणाऱ्या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करा- राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी



मलकापूर - मनोज जाधव - पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलेल्या महिला तक्रार प्रकरणात गेल्या तीन महिन्यापासून कारवाई न करता महिलांच्या तक्रारदारांना केराची टोपली दाखवणाऱ्या तपास अधिकारी संजय महाजन यांच्यावर कामत कसूर करण्याची कारवाई करून त्यांना नोकरीवरून त्वरित निलंबित करण्यात यावे या आशयाचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील यांच्या नेतृत्वात मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना मा. जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे मार्फत देण्यात आले

            बेटी बचाव बेटी पढाव असा नारा देत  सरकार महिलांच्या सुरक्षिततेवर भर देत शक्ती कायद्या सारखे महिला संरक्षणाचे कायदे आणत असतानाच मलकापूर पोलीस स्टेशन मध्ये मात्र महिलांनी दिलेल्या तक्रारीवर तीन-तीन महिने कारवाई होत नसून महिलांच्या तक्रारींना एक प्रकारे केराची टोपली दाखवल्याचे प्रकार मलकापूर पोलीस स्टेशन मधील कार्यरत तपास अधिकारी संजय अनंतराव महाजन यांनी केल्याने तसेच वारंवार त्यांना प्रत्यक्ष भेटून व फोनद्वारे तक्रारी संदर्भात चौकशी केली असता नेहमी उडवाउडवीची उत्तरे व इतर कामे असल्याचे सांगत जवळपास तीन महिन्यापासून महिलांनी दाखल केलेल्या तक्रारीवर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता केवळ आरोपींना सहकार्य केल्याचे निदर्शनास येते सदर नेमलेले तपास अधिकारी यांना कोणते प्रकारचे तंत्रज्ञानाची माहिती नसताना त्यांच्याकडे तपास देऊन महिलांची खिल्ली उडविण्याचा प्रकार मलकापूर पोलीस स्टेशन ने केला असल्याचे विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पोलिसांकडून मिळणाऱ्या अशा वागणुकीमुळे तसेच आरोपींना पाठीशी घालण्याचा वृत्तीमुळे महिला तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा अस्तित्वात आला असताना त्याची कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी  होताना दिसत नाही फोन द्वारे धमकी व शिवीगाळ करणाऱ्या आरोपींशी संगनमत करून आरोपींना अभय देण्याचे काम करणाऱ्या पोलीस तपास अधिकारी संजय महाजन यांच्यामुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलिन होत असून जनतेचा पोलिसांवरील विश्‍वास कायम राखण्यासाठी संजय महाजन यांना सदर प्रकरणात भ्रष्टाचाराच्या व कर्तुत्व कसूर करण्याच्या आरोपाखाली कारवाई करून निलंबित करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील यांनी मा. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना केलेली असून येत्या आठ दिवसात सदर संजय महाजन यांच्यावर कारवाई न झाल्यास राष्ट्रीय समाज पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला 

             सदर निवेदनाच्या वेळी धनश्रीताई काटीकर पाटील जिल्हाध्यक्ष रासप , नंदूभाऊ लवंगे महाराष्ट्र अध्यक्ष युवा मल्हार सेना, प्रा. प्रकाश थाटे जिल्हा संघटक, भरत जोगदंडे तालुकाध्यक्ष, आकाश सोनवाल रासप इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments