Ticker

6/recent/ticker-posts

अनुभव लेखन कशासाठी? लिंगभाव समतेसाठी

 


बुलडाणा नागरीकांमध्ये निवडणूक व त्यासंदर्भात जागृती व्हावी, तसेच त्यांना निवडणूक प्रक्रीयेची माहिती व्हावी या हेतूने भारत निवडणूक आयोगाकडून जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो, या वर्षी महिला दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने निवडणूक आयोगाकडून अनुभव लेखन कशासाठी? लिंगभाव (Gender) समतेसाठी या विषयावरील अनुभव लेखन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सदर उपक्रमांतर्गत सर्वसामान्यांनी त्यांचे अनुभव लेख 25 मार्च 2022 पर्यंत पाठवायचे आहेत. प्राप्त लेखातील निवडक लेखाचे पुस्तक तयार करून, ते प्रसिध्द करण्यात येणार आहे.

   सदर उपक्रम सर्वांसाठी खुला आहे, आपले अनुभव मराठी भाषेत पाठवावेत, अनुभव लेखन पाठवताना शब्दमर्यादा 700 ते 1200 असावी.  लेखन काल्पनिक किंवा तात्विक स्वरूपाचे नसावे, तर अनुभवाधारित असावे. लेखन शक्यतो युनिकोड - टंकलिखीत असावे. ते शक्य नसेल तर सुवाच्य हस्ताक्षरात लिहून, अक्षरे स्पष्ट दिसतील असे फोटो काढून त्यांची पीडीएफ ceo_maharashtra@eci.gov.in या ईमेल वर आपले नाव, पत्ता व संपर्क क्रमांकाच्या तपशिलासह पाठवावे.  त्याची प्रत माहितीसाठी dydeobuldhana@gmail.com या ईमेल वर पाठवावी. सुट्या इमेजचा (फोटोंचा) विचार केला जाणार नाही.

   आपले अनुभव लेखन https://forms.gle/EjnmX6jvspa7cEh48 या गूगल अर्जावरील माहिती भरून त्यावर पाठवावे. ‘कशासाठी? - लिंगभाव समतेसाठी’ या विषयावर अनुभव लेखन पाठविणाऱ्या व्यक्तीचाच अर्ज ग्राह्य धरला जाईल. अधिक माहितीसाठी 8669058325 (प्रणव सलगरकर) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवून संपर्क साधावा. या उपक्रमासाठी दिनांक 25 फेब्रुवारी ते 25 मार्च 2022 या काळात आलेले लेखनच ग्राह्य धरले जातील.

   मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून निवडक लेखांचे पुस्तक प्रकाशित केले जाईल. पुस्तकात लेख प्रसिद्ध करताना त्यात आपल्या नावाचा उल्लेख करायचा की नाही, याविषयीचा निर्णय संबंधित व्यक्तीचा असेल. निवडक लेखांना ‘पुन्हा स्त्री उवाच’ या सांकेतस्थळावर प्रसिद्धी देण्यात येईल.  आलेल्या अनुभव लेखनातून पुस्तकासाठी लेख निवडण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील. एखाद्या सहभागीच्या लेखनावर अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी सदर व्यक्तीची असेल. अनुभव लेखन उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

            सदर अनुभव लेखन उपक्रमामध्ये सर्व मतदार, नागरीक व महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एस.रामामूर्ती,  उप जिल्हानिवडणूक अधिकारी श्रीमती गौरी सावंत  यांनी केले आहे.

                            

Post a Comment

0 Comments