Ticker

6/recent/ticker-posts

अन् भेटले बावीस वर्षांपूर्वीचे सवंगडी



दहावीच्या बॅचचे आंबाशी येथे गेट टूगेदर संपन्न


विवेकानंद  विद्यालय एकलारा येथील सन १९९८ च्या बॅच चे धुलीवंदननिमित्त गेटटूगेदर संपन्न



चिखली  /  मनोज जाधव- दि.१८ मार्च रोजी तालुक्यातील आंबाशी येथे विवेकानंद विद्यालय एकलारा येथील सन १९९८ ला १० व्या वर्गातील मित्रमंडळी धुलीवंदनानिमित्त एकत्रित येत गेट टूगेदर चे आयोजन करण्यात आले होते.

बावीस वर्षांपूर्वी विवेकानंद विद्यालय एकलारा येथे परिसरातील एकलारा,भोरसा भोरशी,पांढरदेव,आ मखेड,आंबाशी,मुंगसरी,शेलगाव,तेल्हारा,बोरगाव,पाटोदा परिसरातील विध्यार्थी शिक्षणासाठी एकत्र आलेले होते,शिक्षणानंतर सर्व मित्रमंडळी पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी गेले व पुढे काहींनी नौकरी तर काहींनी व्यवसाय निवडले त्यात कुणी डॉक्टर, वकील,इंजिनिअर,बिल्डर,कंत्राटदार,बँकिंग क्षेत्र,शिक्षक,समाजकारण राजकारण,शेतकरी आदी क्षेत्रातील मित्र,काही पर राज्यात नौकरी निमित्त  असलेले मित्र तब्बल बावीस वर्षांपासून एका व्हाट्सएपच्या ग्रुपच्या  माध्यमातून एकत्र येत आंबाशी येथे धुलीवंदनाच्या निमित्त एकत्र येत गेट टूगेदर साजर केलं,यावेळी प्रशांत ढोरे पाटील,डॉ.रोहित देशपांडे,गणेश वाघ,महेश भाडाईत,अरुण मुरकुटे,नन्दकिशोर भुसारी,भगवान आकाळ,गणेश आंभोरे,सतीश पुरी,सुनील पुरी,सुनील आंम्बोरे,कृष्णा वाघ,संजय वाघ,भगवान भाकडे,किशोर देवकर,ऍड संजय देशमुख,उमेश देवकर,अशोक गवई,प्रशांत गवई,अंनथा घायवट,भगवान पवार,विश्वास म्हस्के,योगेश म्हस्के,राजेश म्हस्के,विठ्ठल ठेंग,शरद ठेंग,दिनेश ठेंग आदी मित्रमंडळी उपस्थित होती,उत्कृष्ठ असं आयोजन उमेश देवकर व किशोर देवकर यांनी केले होते.

Post a Comment

0 Comments