Ticker

6/recent/ticker-posts

पोलीसांची कारवाई, 56 लोकांना केले हद्दपार

 


चिखली. /मनोज जाधव- होळी ,धुलीवंदन व शिवजयंतीचे (तिथीप्रमाणे) पार्श्वभुमीवर चिखली पोलीसांचे प्रस्तावावरुन उपविभागीय अधिकारी बुलडाणा यांनी केले 56 लोकांना तात्पुरते हद्दपार.

आगामी काळात होळी ,धुलीवंदन ,शिवजयंती (तिथीप्रमाणे) अशा प्रकारचे सण उत्सव साजरे होणार असुन पोलीस स्टेशन चिखली हद्दीतील वारंवार गुन्हे करुन सार्वजनिक अशांतता प्रस्थापीत करण्याच्या  व लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या सवयीच्या लोकांना सण उत्सवाच्या काळाचा फायदा उचलुन सार्वजनिक शांतता भंग होवुन कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये करीता पोलीस निरीक्षक श्री अशोक लांडे यांनी उपविभागीय अधिकारी श्री राजेश हांडे यांचेकडे सार्वजनिक उत्सव कालावधी दिनांक 15/03/2022 ते दिनांक 22/03/2022 पर्यंत 8 दिवस कलम 144 (1) फौ.प्र.संहिता अन्वये सार्वजनिक कार्यक्रम,सण-उत्सव मध्ये सहभागी न होणेसाठी पोलीस स्टेशन चिखली हद्दीतुन तात्पुरते हद्दपार होणेसाठी चिखली शहरास ग्रामीण भागातील एकुण 56 इसमांचे विरुध्द प्रतिबंध आदेश करणेकरीता प्रस्ताव पाठविले होते.त्यावरुन उपविभागीय अधिकारी यांनी सदर प्रस्ताव मंजुर करुन नमुद लोकांना दिनांक 17.03.2022 ते 21.03.2022 पावेतो चिखली पोलीस स्टेशन हद्दीतुन तात्पुरते हद्दपार करण्यात आले आहे.सदर हद्दपार ईसमांनी नमुद कालावधीत परवानगीशिवाय पोलीस स्टेशन चिखली हद्दीत प्रवेश केल्यास त्यांचेवर गुन्हे नोंद करुन कायदेशीर कार्यवाही करण्यात येईत.

आगामी काळात सुध्दा मागील सण उत्सव,नगर परिषद,जिल्हा परिषद,पंचायत समीती निवडणुकीच्या कालावधित अशा प्रकारे गैरवर्तण करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणा-या इसमांवर अशा प्रकारे कार्यवाही करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments