Ticker

6/recent/ticker-posts

धक्कादायक, या शाळेत शिक्षकच देत आहेत, विद्यार्थ्यांना प्रिंट केलेल्या काँप्या !

  


चिखली/ विदर्भ दूत वृत्तसेवा = नुकत्याच  दहावी आणि बारावीच्या परीक्षा शाळांमध्ये सुरू झालेल्या आहेत. यावर्षी कोरोणा काळ असल्याने शिक्षण विभागाने संबंधित,बाराव्या वर्गातील विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांच्याच शाळेमध्ये, म्हणजे स्वतःच्या होम सेंटर वर घेण्याचे निर्देशित केलेले आहे. याच गोष्टीचा फायदा घेत चिखली तालुक्यातील एक बारावीचे परिक्ष सेंटर असलेली एक शााळा विद्यार्थ्यांना उत्तरांच्या झेरॉक्स काढून वाटप करीत असल्याचे धक्कादायक वृत्त विदर्भदूत न्यूज चॅनलच्या हाती लागले आहे. यामध्ये वर्गातील शिक्षकांसह विद्यार्थ्यांना शाळेशी संबंधित संचालक मंडळातील व्यक्तीही काप्या देत असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. विद्यार्थ्यांनी कोणताही अभ्यासाचा ताण न घेता सहज मिळणाऱ्या प्रिंट केलेल्या आणि झेरॉक्स काढलेल्या अचूक उत्तरांच्या मुबलक प्रमाणात काप्या पुरविण्यात येत आहेत. विदर्भ दूत न्यूज चॅनलने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सदर गोष्टी कैद झाल्या असून लवकरच त्याची सत्यासत्यता पडताळून जनतेसमोर आणली जाणार आहे. या प्रकारामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांचे भविष्य खराब करण्यासाठीच अक्षरशः शाळा आणि शाळेच्या संचालक मंडळाही मैदानात उतरल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एक वेळ या शाळेवर गाडी आली असता शिक्षक बोलत होते की एक तासाचा पेपर दबला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान तर होणार नाही ना असाही प्रश्न विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पडत आहे. विदर्भदूत न्यूज चैनल ने केलेल्या सगळ्या स्टिंग ऑपरेशन मधील पुरावे सत्यता संबंधित विभागाची, शिक्षण विभाग असेल शाळेचे संचालक मंडळ असेल प्राचार्य असतील यांच्याशी सविस्तर बोलणे झाल्यानंतर लवकरच हा धमाका विदर्भ दूध न्यूज चैनल जनतेसमोर  आणणार आहे.

संचालक मंडळ नॉटरिचेबल

 आमच्या च्या प्रतिनिधीने संबंधित प्रकरणाबाबत, शहानिशा करण्यासाठी संचालक मंडळातील एका व्यक्तीस फोन केला असता त्यांनी उत्तर देणे टाळले व लगेच मोबाईल स्वीच ऑफ करून टाकला आणि नॉटरिचेबल झालेत हे धक्कादायक आहे.

Post a Comment

0 Comments