Ticker

6/recent/ticker-posts

वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सामुदायिक प्रार्थना सभागृहाचे आमदार अमोल दादा मिटकरी यांच्या हस्ते भूमिपूजन

 


अकोला- वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समिती मोठी उमरी अकोला रजिस्टर नंबर 578 येथील सामुदायिक प्रार्थना सभागृहाचे भूमिपूजन माननीय आमदार श्री अमोल दादा मिटकरी यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी आपल्या स्थानिक आमदार विकास निधी मधून सदरचे सभाग्रह सामुदायिक प्रार्थना ध्यान व चिंतन  व युवका करीता  उपलब्ध करून दिले. त्याबद्दल सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र झामरे तसेच सेवा समितीचे सर्व पदाधिकारी यांनी आभार व्यक्त केले.या भूमिपूजन सोहळ्याला माननीय श्री जयंतराव मसने, श्री बळीरामजी कपले, श्री श्री कृष्णजी ठोंबरे, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन समितीचे अध्यक्ष श्री रामेश्वरजी बरगट, तसेच महाराष्ट्र  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटक माननीय श्री कृष्णाभाऊ अंधारे, तसेच ॲड.श्री. संतोषजी भोरे हे प्रामुख्याने हजर होते. सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चेतन बांगर सर यांनी केले व प्रास्ताविक सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र झामरे  यांनी केले. व आभार सेवा समितीचे सहसचिव श्री राज मस्के यांनी केले.

सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन सेवा समितीचे सचिव श्री संजय इंगळे अध्यक्ष श्रीदेवीदाजी आजनकर, तसेच सेवा समितीचे सदस्य श्री सतीश ठाकरे, श्री सुभाष जयस्वाल, श्री विठ्ठल लोथे, श्री बाळूभाऊ लाडे, श्री श्रीकृष्ण वानखडे, श्री गणेश सोयाम, श्री बंडू राजगडे, श्री वसंतराव गावंडे, श्री लक्ष्‍मण धुरडे, श्री मनोज मेश्राम, श्री वसंतरावजी वाघमारे, श्री राजू सुर्वे, तसेच सेवा समितीचे मार्गदर्शक व माजी सचिव श्री प्रमोद शेंडे व गुरुदेव सेवक यांनी सदरच्या कार्यक्रमाचे चांगल्या प्रकारे नियोजन केले सभेच्या शेवटी राष्ट्रवंदनेने समारोप करण्यात आला व सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments