जितुभाऊ अडेलकर यांचा वागदेव येथे दौरा
MEHKAR/ केशव शिरसाठ- रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते जितुभाऊ अडेलकर यांनी रविवारी घाटबोरी पंचायत समिती सर्कलमध्ये असलेल्या आदिवासी ग्राम वागदेव येथे भेट दिली.
भेटीदरम्यान त्यांनी स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या व सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासोबत रयत क्रांती संघटनेचे जिल्हा सचिव गोपाल भाऊ पाचपवार, पंचायत समिती सर्कल प्रमुख चंद्रकांत नरवाडे, पत्रकार केशव शिरसाठ, गजानन मर्दाने, सिद्धार्थ गव्हांदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
नागरिकांनी यावेळी आरोग्यविषयक समस्या शिधापत्रिका संबंधी येणाऱ्या अडचणी व त्यासाठी होत असलेली पैशाची मागणी या बाबींची व्यथा मांडली. कोणत्याही शासकीय कामासाठी कोणाला लाच देऊ नका तुमच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवल्या जातील, असे आश्वासन जितुभाऊ यांनी यावेळी दिले.



0 Comments