Ticker

6/recent/ticker-posts

राम गोपाल वर्मा ने मोदींना केलेलं ट्विट वाचून तुम्हीही थक्क व्हाल.....


“तुमच्या लवकरच येणा-या ‘तिसरी लाट’ या हाॅरर चित्रपटामध्ये मला मृतदेह मोजण्यासाठी स्पाॅट बाॅयचं काम द्या”

Ram Gopal Verma


मुंबई | देशात सुरू असलेल्या कोरोना महामारीने वर्षभराचा उंबरठा गाठला असून ती वेगाने पुढे जात आहे. आरोग्य यंत्रणाही असह्य आणि कमी पडत आहेत. 


या भयावह महामारीने देश ढवळून निघत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर, लसींचा पुरवठा, बेड्स यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेकजण मृत्यूच्या दारात ओढल्या जात आहे. 


राज्यासोबतच, केंद्र सरकारही या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. अश्यातच प्रसिद्ध चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी पंतप्रधान मोदींना केलेल्या ट्विटमुळे संताप व्यक्त केल्या जात आहे. 


सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते म्हणून राम गोपाल वर्मा हे नाव सर्वांना परिचित आहे. तेलगु आणि बाॅलिवूड चित्रपटसृष्टीत त्यांची चांगली पकड आहे. मात्र, अलिकडील काळात त्यांनी नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना टॅग करुन एक ट्विट केलं आहे. या ट्विटमधून वर्मा यांनी दोघांवरही संतापजनक टिका केली आहे. 


या ट्विटमध्ये, "आपण आपल्या येणा-या ‘तिसरी लाट’ या हाॅरर चित्रपटात मला स्पाॅटबाॅयचं काम द्या, असं पंतप्रधान मोदींना उद्देशून म्हटलं आहे. त्याचबरोबर मृतदेह मोजण्याच्या विभागात मला क्लर्कचं काम द्यावं, अशी विनंती त्यांनी केली आहे. कारण तुम्हाला जेवढे मृतदेह आवडतात तेवढेच मला देखील आवडतात. कारण मात्र वेगवेगळे असू शकते," असंही म्हटलं आहे.


दुस-या ट्विटमध्ये सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधत, "2014 मध्ये मोदींना ‘मौत का सौदागार’ असं सोनिया गांधी म्हणाल्या होत्या. मला अजिबात कल्पना नव्हती की त्यांची इतक्या दुरची दुरदृष्टी आहे. सोनियाजी तुम्ही मला तुमचे चरण डिजीटली पाठवावे जेणेकरून मी त्यांना स्पर्श करू."

 

Twit

Post a Comment

0 Comments