Ticker

6/recent/ticker-posts

पंतप्रधानांनी ट्विटरवरून केलं ममता बॅनर्जींचं अभिनंदन......वाचा सविस्तर....

PM and Mamta Didi


नवी दिल्ली | नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांची करडी नजर होती.

कालपर्यंत करण्यात आलेल्या कलानुसार यंदा तृणमूल काँग्रेसने निवडणूकीच्या रिंगणात मुसंडी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. या विजयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या गेलेल्या कलाचे स्वागत करत थेट ट्वीटरद्वारे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं काल अभिनंदन केलं.


गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे. तृणमूल काँग्रेस 209 जागांवर आघाडीवर असून भाजप 82 तर इतर 2 जण आघाडीवर आहेत. 


पश्चिम बंगालमधील विजयासाठी ममता दीदींचं अभिनंदन करत, जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि कोरोनाला हरविण्यासाठी सर्वतोपरी मदत करू, केंद्र सरकार पश्चिम बंगाल सरकारला पुढेही सहकार्य करत राहील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटद्वारे म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments