Ticker

6/recent/ticker-posts

असे म्हणतात, या मंदिरात झोपल्यावर महिला होतात प्रेगनंट....



प्राचीन काळापासून घडत आलेल्या अद्भुत, चमत्कारिक कथांबद्दल आजही आपण ऐकत असतो. आजचे युग हे जरी विज्ञानाचे असले तरी अजूनही काही गोष्टींवर आपण अंधश्रद्धेपोटी विश्वास ठेवतो. अनेक रहस्यपूर्ण गोष्टी तर ऐवढ्या चमत्कारिक असतात की, विज्ञान देखील त्याचा शोध घेणं सुरू करतं.


आपल्या देशात आजही काही चमत्कारीक मंदीर अशी आहेत, जीथे गेल्याने मनातील ईच्छा पूर्ण होते, असे मानले जाते. आज अश्याच एका मंदिराबद्दल वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या मंदिरातील विशेष बाब म्हणजे ज्या महिलांच्या लग्नाला कित्येक वर्ष होऊनही मुल बाळ होत नाही, त्या महिला या मंदिरातील फर्शीवर रात्रभर झोपल्याने त्या गरोदर होऊ शकतात. अशी इथल्या लोकांची आस्था आहे. 


हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यात असलेले हे मंदिर माता सिमसा नावाने प्रसिद्ध आहे. या मंदिरात येणा-या ज्या महिलांना आपल्याला मुलं व्हावं असं वाटतं, त्या स्त्रीया मोठ्या विश्वासाने आणि आस्थेने या मंदिरात येतात. या स्त्रीया एक रात्र या मंदिरात झोपल्यानंतर काही दिवसांतच त्या गरोदर होतात. 

कारण स्वतः देवी शारदा मुलगा किंवा मुलगी घेवून येथील महिलांच्या स्वप्नात येऊन, त्यांना आर्शिवाद देते असा येथील लोकांचा विश्वास आहे. 


या मंदिराच्या या खास वैशिष्ट्यामुळे हे मंदिर मुलांना जन्माला घालणारे मंदिर म्हणून ओळखले जाते. नवरात्रीत या मंदिरात सलिंद्र उत्सव साजरा केला जातो. सलींद्र म्हणजे स्वप्न येणे. येथे दिवसा किंवा रात्री झोपत असलेल्या महिलांना देवी स्वप्नात येवून दर्शन देते आणि मुल किंवा मुलगी त्यांच्या पदरात घालते. याशिवाय येथील स्त्रिया स्वप्नांमध्ये फळे किंवा धातूदेखील पाहतात.


या संकेताचे देखील भिन्न स्वरूपाचे समज आहे. जर एखाद्या स्त्रीला तिच्या स्वप्नात फळ दिसले तिच्या घरी लवकरच बाळाच्या आवाज गुंजणार आहे, असे मानल्या जाते. स्वप्नात पेरू चे फळ पाहणे म्हणजे मुलगा आणि एक भेंडी दिसली तर याचा अर्थ मुलगी जन्माला येईल. याउलट एखादा धातू किंवा लाकूड दिसले तर ते एक अशुभ चिन्ह मानले जाते. याचा अर्थ असा की ती कधीही आई होऊ शकणार नाही.

Post a Comment

0 Comments