आधी झोपेच्या गोळ्या, नंतर शाॅक....वाचा सविस्तर
मध्य प्रदेश | एक पत्नी ही आपल्या पतीचे आयुष्य परत मिळविण्यासाठी सावित्री होऊ शकते, असे अनेकदा वाचले असेल. पण सध्याच्या परिस्थितीत सर्वच पत्नी सावित्री असेल, असे सांगता येत नाही. कारण घडलेल्या या प्रकाराने सर्वांनाच धक्का बसला आहे. एक सुशिक्षित पत्नीने आपल्याच पतीची निर्घुणपणे हत्या केल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे.
मध्य प्रदेशमधील छतपूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. ममता पाठक असं या उच्चशिक्षित आरोपी महिलेचं नाव आहे. ममता ही शिक्षीका असून तिचे पती नीरज पाठक हे डाॅक्टर होते. ममताची प्रकृती ठीक नसल्याने तिचा पती तिला गोळ्या देत असत.
परंतू ममताला मात्र तिचा पती हा चुकीच्या गोळ्या देऊन, तिला आजारात ढकलत असल्याचा संशय होता. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होता.
सततच्या वादाला कंटाळून ममताने आपल्या पतीला कायमचे शांत करण्याचे ठरवले. त्यानुसार तीने पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि नंतर त्याला शाॅक देऊन त्याची हत्या केली.
29 एप्रिलला ममताने तिच्या पतीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या घातल्या. पती गाढ झोपेत आहे हे समजताच ममताने त्याला शाॅक दिला, ज्यात पतीचा जागीच मृत्यू झाला. आपल्यावर कुणालाही संशय येऊ नये यासाठी ममता झांसीला निघून गेली. दोन दिवसांनी ती परत आपल्या घरी आली आणि पोलिसांना फोन करुन पतीचा मृतदेह आढळल्याची माहिती दिली.
हे प्रकरण हाय प्रोफाईल असल्याने पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी केलेल्या तपासा दरम्यान ममताचं पितळ उघडं पडलं आणि पोलिसांनी ममताला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.



0 Comments