Ticker

6/recent/ticker-posts

जाणून घ्या, अजून का अडकला नाही भाईजान लग्नाच्या बेडीत

वडिलांनी केला मोठा खुलासा




बॉलीवूडमधल्या भाईजानची म्हणजे सलमान खानची सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चा होत असते. या कारणांपैकी एक कारण अनेकदा चर्चेत असते, ते म्हणजे भाईजानच्या लग्नाचं. त्याच्या लग्नाच्या चर्चेने तो कायम चर्चेत असतो.


बाॅलीवूडमधल्या अनेक अभिनेत्रींशी सलमान खानचे नाव जुळल्या गेले. पण प्रत्येकवेळी ती अफवा असल्याचं समोर येई. सलमान खानच्या आईलाही त्याचे लग्न बघायचे आहे, अनेकदा त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. सलमान खान ला माध्यमांमधून अनेकदा लग्नाबाबत विचारले जाते, तेव्हा सलमान खान कायमच उडवा उडवीची उत्तरे देतांना दिसून येतो.


माध्यमांकडून जेव्हा सलीम खान यांना, सलमान खान लग्न का करत नाही? असा प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्यांनी, प्रत्यक्षात मात्र सलमान खानला हवी तशी मुलगीच भेटली नसल्याने, तो लग्न करत नसल्याचा मोठा खुलासा केला. त्यासोबतच सलमान खान हा कामात एवढा व्यस्त असतो की, त्याला लग्न कधी करावे हा प्रश्न पडतो, असंही त्याचे वडील म्हणाले. 


एखाद्या नवीन अभिनेत्रीसाठी सलमान खान चित्रपटात काम करतो. तेव्हा त्याचे त्या चित्रपटातील अभिनेत्रीशी नाव जोडल्या जाते. पण प्रत्यक्षात मात्र सलमान खान जेव्हा एखाद्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडतो, तेव्हा तो त्या अभिनेत्रींमध्ये स्वतःच्या आईला बघत असतो.


कारण आपल्या ख-या आयुष्यात त्याला आपल्या आईप्रमाणे कुटूंबाची काळजी घेणारी, आईला घरकामात मदत करणारी, मुलांना सांभाळून त्यांचा अभ्यास घेणारी, मुलगी हवी आहे. अशी मुलगी अजून तरी मिळाली नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments