Ticker

6/recent/ticker-posts

घरकुल लाभार्थ्यांचा निधी नगर पालिकेला सुपूर्द



नगरपालिकेच्या 507 घरकुल लाभार्थ्यांना मागील दीड ते दोन वर्षापासून थकीत असलेला दुसरा हप्ता मिळवण्यासाठी नगरसेवक साकिब शहा यांनी आठ ते दहा डिसेंबर पर्यंत उपोषणाचे शस्त्र उभारले होते घरकुल निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्या या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले मागील शुक्रवारी म्हाडा मुंबई यांच्याकडून राज्य शासनाकडून वितरित होणारा तीन कोटी चार लाख 20 हजाराचा निधी पुसद नगर परिषदेला सुपूर्द करण्यात आला आहे.

त्यामुळे आता हा निधी 507 घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या घरकुल कामाच्या प्रगती नुसार वितरित होणार असल्याने घरकुल लाभार्थ्यांना उपोषण करते साकिब शहा यांचे विशेष आभार मानले आहे.

व नगरसेवक साकेत शहा यांनी आपण उपोषण करताना ज्या सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला त्या सर्व पाठिंब्यावरच माझ्या उपोषणाची ताकद वाढली होती व त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी यशस्वी झालो असे नगरसेवक साकिब शहा यांनी सर्व पक्ष व सामाजिक संघटना संघटना चे आभार मानले आहे.

विदर्भदूत साठी ,यवतमाळ पुसद प्रतिनिधी राजेश ढोले

Post a Comment

0 Comments