Ticker

6/recent/ticker-posts

विविधांगी उपक्रमातून साजरा झालेल्या वाढदिवसाची सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव



थंडीत कुडकुडणाऱ्याला ब्लॅंकेट, भुकेल्याला अन्न, जीवन वाचवण्यासाठी रक्तदान, पर्यावरण सुरक्षिततेसाठी वृक्षारोपण  

थंडीत कुडकुडणाऱ्याला ब्लॅंकेट, भुकेल्याला अन्न, जीवन वाचवण्यासाठी रक्तदान, पर्यावरण सुरक्षिततेसाठी वृक्षारोपण अशा समाजशील उपक्रमाने  भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांचा वाढदिवस साजरा. वाढदिवसाच्या परंपरागत नियोजनाला फाटा देत दररोज नव्हे तर तासंतास समाजसेवेसाठी वाहून घेत माणुसकी हा एकच धर्म पाळत त्यानुसार आपले कर्तव्य पार पाडणारे भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे, यांचा वाढदिवस अनेक विविध  उपक्रमाने मित्र मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आल्याने याबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमुळे  या वाढदिवसाची सर्वत्र चर्चा सोबतच कौतुकाचा वर्षाववही होतांना दिसत आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये भीक मागून आपला रस्त्यावरच जीवन संघर्ष करत असणाऱ्यांना एक मायेची उब म्हणून  ब्लँकेट वाटप करण्यात आले, विशेषता हा उब देणारा उपक्रम आहे .

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला रात्री अकरा ते एक वाजेपर्यंत राबून शहरांमध्ये ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे लोक रस्त्यावर थंडीने कुडकुडत झोपलेले पाहून त्यांच्या अंगावर ब्लॅंकेट टाकून उपक्रम राबविण्यात आला. तर सकाळी दहा वाजता उपजिल्हा रुग्णालय येथे माणुसकीच्या भिंतीवर किशोर दादांचा वाढदिवसाचा कार्यक्रम राबविल्यानंतर कोणाच्या संकट काळात आपल्या जिवाची पर्वा न करता कर्तव्यावर असलेले पोलीस व डॉक्टर यांचा सत्कार कार्यक्रम सुद्धा भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर दादा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला.  व त्यानंतर गोरगरीब रुग्ण असलेल्याना अन्नदानाचा उपक्रम राबवून वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. नंतर  दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत शिवाजी चौकामध्ये प्रेरणादायी सुगम संगीताचा कार्यक्रम राबून बुंदीच्या लाडूचा केक कापून तो गोरगरिबांना वाटप करण्यात आला याठिकाणी प्रा. जर्नाधन गजभिये यांनी युवकांचे मनोबल वाढविणारे गिता सोबत भीम गीते सुद्धा सादर केली.  

त्यानंतर मेडिकेअर ब्लड बँक येथे सिकलसेलग्रस्त रुग्णांसाठी रक्तदान शिबिर राबविण्यात आले या जीव वाचवण्यासाठीच्या रक्तदान शिबिराची सुरुवात स्वतः किशोरदादा कांबळे यांनी रक्तदान करून उद्घाटन केले.  भिम टायगर सेनेच्या आटो ॲम्बुलन्स चे चालक वर्गांना एक शाबासकीची थाप म्हणून गोरगरीब रुग्णांना ऑटोद्वारे घरापासून ते रुग्णालयापर्यंत चा मोफत प्रवासाची सेवा देणा-या चालकांचा यथोचित सत्कार करून त्यांना प्रेरित करण्याचे कार्य भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांनी केले.

        तसेच शहरामध्ये विविध ठिकाणी मित्र मंडळाच्या वतीने वाढदिवसाचे विविध कार्यक्रम राबविण्यात आले यासोबतच सेव नेचर ग्रुप पुसदच्या वृक्ष आणि पाण्याचे संगोपन करून वाचू आपले जीवन आणि पर्यावरण या उपक्रमांमध्ये सुद्धा सहभाग नोंदवला अशाप्रकारे आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा झालेल्या या वाढदिवसाच्या विविधांगी उपक्रमाचे फोटो व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाल्याने या वाढदिवसाचे सर्वत्र कौतुक व अशाच प्रकारचे वाढदिवस राबवून गोर गरीब गरजूंना आपापल्या परीने शक्य मदत आहे ती पोहोचवण्यासाठी उपक्रम राबवण्याची प्रेरणा सुद्धा या निमित्ताने सर्वांना मिळाले असल्याची अनेक कमेंट्स सोशल मीडियावर मिळत असल्याने याची सर्वत्र चर्चा सुरू आहे या संपूर्ण उपक्रमाच्या  यशस्वीतेसाठी मारोती भस्मे, दिलीप खैरे, साकिब शहा, सतीश पडघणे, बाळा टाकरस, अण्णा दोडके, नारायण दोडके, गौतम खडसे, प्रभाकर खंदारे, दत्ता कांबळे, संजय शेळके, विनोद जाधव, विक्रम खंदारे, राहुल झिंजारे, सतीश खडसे,विकास पाईकराव, सागर झरकर, विपुल केवटे, सय्यद करीम, गीताताई कांबळे, अनिल कांबळे, सीमा असोले, आम्रपाली केवटे,प्रशांत ठाकूर, विशाल भालेकर, गजानन कांबळे आदींसह कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. बाळासाहेब वाठोरे ,लक्ष्मण कांबळे, बाळासाहेब कांबळे ,राजेश ढोले, समाधान केवटे ,विजय राठोड ,सोनू वाढवे, इत्यादींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 यवतमाळ /पुसद प्रतिनिधी 

Post a Comment

0 Comments