Ticker

6/recent/ticker-posts

अखेर मोटार सायकल चोर जेरबंद



पुसद शहर हद्दीत झालेल्या मोटरसायकल चोरीचे गुन्हयासंबंधाने पोलीस स्टेशन पुसद शहर येथे वाढत्या मोटार सायकल चोरीच्या घटणा दिवसेनदिवस वाढत असतांना मा.पोलीस अधिक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील,अपर पोलीस अधिक्षक श्री.खंडेराव धरने, सहा पोलीस.अधिक्षक तथा उप.विभागीय पोलीस अधिकारी पुसद अनुराग जैन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन पुसद शहरचे पोलीस निरीक्षक पाडुरंग फाडे यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजी वार्ड बिट ईन्चार्ज नाईक पोलीस अंमलदार सुनिल पवार पोलीस अंमलदार शुध्दोधन भगत यांनी गोपनीय बातमीदार सक्रीय करुन मिळालेल्या खात्रीलायक माहीती वरुन मागील काही दिवसा पासुन मोटार सायकली चोरी करणा-या आरोपी शेख हसन शेख रहेमान वय 20 वर्ष रा.मोमीनपुरा पुसद ता.पुसद.जि.यवतमाळ यास सिताफिने अटक करुन मोटर सायकल चोरी करणा-या चोराचा पर्दाफाश करन्यात यश मिळालेले आहे. सदर चोराकडुन पुसद शहरातुन चोरी गेलेल्या सात मोटार सायकली किंमत 2,80.000/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर आरोपी कडुन ईतर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटार सायकली मिळण्याची शक्याता आहे. सदरची कर्यावाही शिवाजीवार्ड बीट अंमलदार ना.पो.कॉ सुनिल पवार,पो.कॉ.शुध्दोधन भगत तसेच मनोज कदम,माधव आत्राम,नापोकॉ राहुल कोकरे हे तपास करीत आहे.

विदर्भदूत साठी यवतमाळ पुसद प्रतिनिधी राजेश ढोले

Post a Comment

0 Comments