Ticker

6/recent/ticker-posts

एमआयएम पक्षाच्या कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न



मेळाव्यात स्टुडन्ट युथ विंगची केली स्थापना

आगामी नगर पंचायत, नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वूमीवर एमआयएम पक्ष बांधणीची सुरुवात पुसदमध्ये केली आहे.  यासाठी एमआयाएम पक्षाचे राज्य अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील, कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी यांच्या नेतृत्वा खाली महाराष्ट्र सरचिटणीस फिरोज लाला यांच्या नेतृत्वात पक्ष बांधणीसाठी प्रयत्न केले जाणार आहे. पक्षाला पुसद तालुक्यात मजबूत आणि बळकट करण्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. पक्षाच्या मजबुतीसाठी दि . 12 डिसेंबर रोजी येथील शासकीय विश्राम गृहात एमआयएमच्या पक्षाच्यावतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी त्यांच्या सोबत विदर्भ अध्यक्ष अब्दुल नाजीम, मराठवाडा सरचिटणीस अब्दुल कलीम रमजानी, मराठवाडा युथ अध्यक्ष, ॲड. सैय्यद वाजीद, शेख मुसा, सैय्यद इरफान उपस्थित होते. वंचित आघाडीचे कार्यकर्ते गब्बर निर्बान सह अनेक सामजिक कार्यकर्त्यांनी एम.आय एम पक्षात प्रवेश घेतला .  युवकांना सामाउन घेण्यासाठी एम.एम.युथ विंगची स्थापना करण्यात आली.  यावेळी डॉ. मोहम्मद मुजम्मील , मोहम्मद मुसा यांनी आचार्य पदवी प्राप्त केल्या बद्दल फिरोज लाला यांचे शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार व अभिनंदन करण्यात आले.

 एमआयएम पक्षाचे पुसद तालुका अध्यक्ष अमजद खान, शहर अध्यक्ष सैय्यद सिद्दिकोद्दिन, मिर्झा अदिल बेग, अवेज मिर्झा, डॉ. जुबेर, फिरोज खान, अमानुल्लाह, कृष्ण जाधव, झियाऊल हक्क, जलील कुरेशी, नाजीम सुफी, मोहम्मद जिब्रान, स्टुडन्ट युथ विंगचे सुफियान खान पठाण व मुजाहिद सैफी यांच्या सह एमआयएमचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

राजेश ढोले यवतमाळ पुसद प्रतिनिधी

Post a Comment

0 Comments