Ticker

6/recent/ticker-posts

सर्वच कामे निकृष्ठ, प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप



लाखो रुपये निधी खर्च करून होत असलेल्या कामांमध्ये निकृष्ट दर्जाची माती मिश्रित  रेती  आणि मटेरियलचा वापर होत असल्याचा आरोप आहे. डोंगरगाव मधील सर्वच कामे एकाच कंत्राटदाराला दिल्याने संभ्रम असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचा लाखो रुपये  निधी हडप केला जात आहे.

महागाव तालुक्यातील डोंगरगाव ग्रामपंचायत अंतर्गत चौदाव्या वित आयोगातून लाखो रुपये खर्च करून  होणाऱ्या  विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून या कामांमध्ये मातीमिश्रित रेती आणि बोगस मटेरियल वापरून इस्टिमेट प्रमाणे कामे  न करता शासनाचा निधी हडप केला जात असल्याचा आरोप आहे.

डोंगरगावातील ग्रामपंचायत अंतर्गत होणारी सर्वच कामे एकाच कंत्राटदाराला दिल्याने नागरिकांत संभ्रम  निर्माण होत असून कंत्राटदार आणि अधिकारी यांचे आर्थिक संबंधातून साटेलोटे तर नाहीत ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 यवतमाळ प्रतिनिधी राजेश ढोले

Post a Comment

0 Comments