Ticker

6/recent/ticker-posts

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) युवा तालुकाध्यक्ष उमरखेड पदी अथरोद्दीन नाजिमोद्दीन खतीब यांची निवड

 


रिपाई आठवले उमरखेड युवा तालुकाध्यक्ष पदी अथरोद्दीन नाजिमोद्दीन खतीब यांची निवड करण्यात आली असून तालुक्यामध्ये गाव तेथे युवा आघाडी कार्यरत असाव्या अशी निर्देश व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब यांना अभिप्रेतअसलेले कार्ये व पक्ष संघटन वाढविण्यासाठी युवकांना रिपब्लिकन विचार जन माणसात पोहचविण्या करीता फुले शाहु आंबेडकर विचार धारेला बळकट करण्यासाठी कार्य करु असे यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना खतीब म्हणाले. त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय रिपाई (आ) जिल्हा अध्यक्ष महेंद्र मानकर विधानसभा अध्यक्ष एस. वि. बरडे यांना दिले. तसेच  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले, तालुका व शहर कार्यकारणी पुसद तालुक्याच्या वतीने बाळासाहेब वाठोरे,लक्ष्मण कांबळे ,राजेश ढोले ,दिलीप धुळे, प्रकाश धुळे, अंबादास वानखेडे, मोहम्मद अजीज सर, अमर पाटील, वसंत वाघमारे ,प्रेम ठोके, राजू बलखंडे ,जयराम माथने,इत्यादींनी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

जिल्हा प्रतिनिधी राजेश ढोले

Post a Comment

0 Comments