Ticker

6/recent/ticker-posts

फक्त शिक्षणानेच मुस्लिम समाजाची प्रगती होईल- प्रा.सलमान सय्यद



उमरखेड येथे ,ईल्म हासिल करो ऑर्गनायझेशन अंतर्गत " जश्ने गौसूलवरा,शैक्षणिक सभा आयोजित करण्यात आली होती.या मध्ये मुस्लीम समाजातील शैक्षणिक समस्यावर चिंतन करण्यात आले आणि समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्या गोष्टी करता यईल त्यावर चर्चा करण्यात आली .या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मौलाना सय्यद अहेमद रझा सहाब होते तर कार्यक्रमांचे मुख्य अतिथी पुसद येथील पि. एच डी स्कॉलर प्रा.सलमान सय्यद, शेरू होत. कार्यक्रमाचे आयोजन नझिर अतिष आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आणि प्रथमच उमरखेड शहरा मध्ये अल्पसंख्यांक समाजक्तर्फे एक शैक्षणिक सभेच आयोजन करण्यात आले या मध्ये उमरखेड शहरातील काझी पुरा येथे हा कार्यक्रम संपन्न झाला आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे मध्ये जनसामान्य लोकांचा सहभाग हा खूप मोठ्या प्रमाणात होता.या कार्यक्रमा मध्ये मौलाना सय्यद अहमद रझा साहेबांनी समाजाच्य प्रगती करिता महत्वाचे मार्गदर्शन केले आणि नासिर सरांची शारीरिक व बौद्धिक या गोष्टींकडे सर्वांचे लक्ष केंद्रित केले .तसेच या कार्यक्रमाचे मुख्यातिथी प्रा.सलमान सरांनी समाजाच्या दुर्गती ची कारणे आणि त्या वरील उपाय म्हणजे शिक्षण या वर सर्वांचे लक्ष केंद्रित करून कआणि प्रशासकीय सेवेतिला परीक्षेबाबत माहिती देऊन उमरखेड मधून आए.ए.आए/आए.पि.एस बनवा या वर लोकांना प्रोत्साहित केले आणि ग्रँथालय बनविण्यासाठी लोकणाकडून निर्धार करून घरातला .अश्या प्रकारे "मुस्लिम समाजाला साक्षर बनविण्यासाठी एक शैक्षणिक कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमा नन्तर समाजातील लोकांच्या खूप सकारात्मक प्रतिक्रिया मिळण्याल्या तसेच नाजीर अतिष भाऊंनी खप कष्टनी हा कार्यक्रम घेतला त्या मुळे सर्वीकडे त्याच कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments